रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
अखिल स्तरीय महा ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना महाराष्ट्र राज्य ची रावेर तालुका स्तरीय कार्यकारिणी ची बैठक रावेर येथील तहसील कार्यालय जवळ आज दि. 22 रोजी संपन्न झाली.[ads id="ads1"]
या बैठकीत कार्यकारणी चे तालुका अध्यक्षपदी धनराज घेटे, उपाध्यक्षपदी किरण सावळे, सचिवपदी जयवंत चौधरी तर सहसचिवपदी अमोल बारी यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. सदरहू संघटना सर्व व्ही. एल. इ. यांच्या भविष्यासाठी, प्रगतीसाठी व उन्नतीसाठी कार्य करणार असून व्ही. एल. इ. यांना वेळोवेळी येणाऱ्या समस्यांचे निराकरण करणार असल्याचे सांगण्यात आले. [ads id="ads2"]
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन नकुल बारी यांनी तर आभार प्रदर्शन विलास ताठे यांनी केले.
बैठकीत सुमारे 30 व्ही. एल. इ. उपस्थित होते व त्यांची सदस्य म्हणून या कार्यकारणीत नोंदणी करण्यात आली.
हेही वाचा : बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ : जळगाव जिल्ह्यातील घटना
हेही वाचा : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती