नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Vidhansabha 2024) दमदार यश मिळवल्यानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य केले आहे.यामुळे राज्यातील रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकांवरील सुनावणी जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी 4 जानेवारी रोजी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुनावणीच्या निकालानंतर पुढील तीन महिन्यांत निवडणुका घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) स्पष्ट केले आहे.[ads id="ads1"]
भाजपची तयारी सुरू
विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने मोठे यश मिळवले असून, भाजपने आतापर्यंतच्या सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) संपताच भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर होण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी निवडणुकीसाठीच्या हालचालींचे संकेत देत, निवडणुका वेळेत होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. या वक्तव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे.[ads id="ads2"]
राजकीय हालचालींना वेग
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्व पक्षांचे लक्ष केंद्रित झाले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी निवडणुका कोणत्या महिन्यात होणार, त्यावरच राज्यातील राजकीय दिशा ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांनी निवडणूक रणसंग्रामासाठी कंबर कसली आहे.
हेही वाचा : बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ : जळगाव जिल्ह्यातील घटना
हेही वाचा : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती