अवकाळी पावसामुळे धुरखेडा येथील घराची भिंत कोसळून 72 वर्षीय महिलेचा मृत्यू
रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रासह संपूर्ण जळगाव जिल्हाभरात पाऊस चांगलाच सुरू असून दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील धूरखेडा येथील पर्वता बाई भागवत अटकाळे वय 72 वर्ष ह्या आपल्या घरात स्वयंपाक करीत असताना सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि त्या दाबल्या गेल्या.
(ads)
त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना धुरखेडा या गावी घडली.या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे.प्रशासनातर्फे त्वरित मदत मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे.


