सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सहस्त्रलिंग शाळेत राबविला जात आहे " परिवर्तनाच्या वाटेवर " हा आगळा वेगळा उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 







रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडे वसलेल्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेले एक छोटेसे, आदिवासी वस्ती असलेले , दुर्गम भागातील सहस्त्रलिंग गाव व त्या गावात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौध्दिक, सामाजिक, सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील असलेली जि प प्राथ शाळा सहस्त्रलिंग. शाळेत सातत्याने अभिनव उपक्रम राबविले जातात व विद्यार्थ्यांना विविध अध्ययन अनुभव देण्यासाठी इथले शिक्षक नेहमी तत्पर व कार्यमग्न असतात . या कामी त्यांना शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभते . 

(ads)

शाळेत राबविले जाणारे उपक्रम

* बचत बँक

* निवडणूकीच्या माध्यमातून बचत बँकेच्या व्यवस्थापकाची निवड

* इ ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण व नियोजनपूर्वक हाताळण्याची संधी

* साप्ताहीक अभ्यास विजेता या उपक्रमा अंतर्गत आठवड्यातून एका विद्यार्थ्याला बक्षीस वितरण व "साप्ताहीक अभ्यास विजेता" हा बॅज आठवडा भर लावला जातो व आठवडा भर सदर विद्यार्थ्याला शाळेचे नेतृत्व करण्याची संधी दिली जाते.

* वर्षभरात विद्यार्थ्यांना १०० बोधकथा सांगितल्या जातात.

* विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत साजरा केला जातो.

* " परिवर्तनाच्या वाटेवर " या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक शनिवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकामी, संवाद साधण्यासाठी शिक्षण, प्रशासन, कला, साहित्य, वैद्यकीय, सांस्कृतिक, क्रिडा, सामाजिक व तत्सम क्षेत्रातील मान्यवर व्यक्ति किंवा संस्थांना पाचारण केले जाते. प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्यक्तिला " वाटसरु " हे संबोधन दिले आहे व आतापर्यंत ७ वाटसरुंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

(ads)

भेट देणारे वाटसरु

पहिले वाटसरु - श्री वासिम तडवी कुंग्फू कराटे सुवर्णपदक विजेता व चित्रपटात भूमिका

दुसरे वाटसरु - श्री युनूस तडवी बार्टी पुणे येथे १० वर्ष प्रकल्प अधिकारी म्हणून काम

तिसरे वाटसरू - श्री अशोक चौधरी कागदकाम

चौथे वाटसरू - श्री रामचंद्र वाघोदे फिल्म मेकर व स्क्रीन प्ले रायटर

पाचवे वाटसरू - अजीत तडवी स्थानिक तडवी भिलोरी भाषेत चित्रपट, गीत व नाटीका निर्माते

सहावे वाटसरु - श्री महेंद्र वाघ विपश्यना व आनापान साधना 

सातवे वाटसरू - श्री जमाल तडवी तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन

(ads)

या उपक्रमांसोबतच शाळेची नियमित सहल आयोजित केली जाते . दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच शाळेला ग्रामपंचायत मार्फत विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्ययन करण्यासाठी टेबल व खुर्च्या देण्यात आल्या आहेत , सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शाळा स्मार्ट टीव्ही, संगणक व प्रोजेक्टरने सुसज्ज आहे. मुख्याध्यापक श्री विकास सुरवाडे, उपशिक्षक श्री साईनाथ चन्ने यांच्यासोबत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती नमिरा तडवी ,शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी युवा सदस्य श्री आसिफ तडवी, स्वयंपाकी शाबेराबाई तडवी, शकीला तडवी यांचेही शाळेला सहकार्य लाभते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!