यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : यावल (Yawal) येथील बाबुजीपुरा परिसरात सहा वर्षीय बालकाचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
मोहम्मद हन्नान खान माजिद खान (वय ६) असे या बालकाचे नाव आहे. दिनांक ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी शेजारील घरातील वरच्या मजल्यावर आढळून आला.
(ads)
मुलाचा मृतदेह शेजारील घरातील वरच्या मजल्यावर आढळल्याने संतप्त जमावाने संशयिताच्या दुकानावर दगडफेक केली. यामुळे शहरातील (Yawal City) दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम यावल पोलिसात (Yawal Police Station) सुरु होते.