यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील पथराळं / शिरागड / येथे रविवार दि. १४ सौ.योगीता प्रताप सोनवणे सरंपच यांच्या नेतृत्वा खाली प्रताप बाजीराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पथराळ शिरागड या गृप ग्रामपंचायतच्या माध्यमातुन दिव्यांग बांधवा साठी माहिती व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन अरुण पाटील नायगांव कर अध्यक्ष दिव्यांग कल्याण ५% शेष निधी अतर्गत समिती यावल यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या विविध योजना सोयी सवलती बाबतीत गावनिहाय तळागाळातील सर्वसामान्य गरजु गरीबा पर्यंत या योजनेचा लाभ मिळावा या प्रेरीत उद्देशाने अनमोल असे मार्गदर्शन केले .
यावेळी गावातील उपस्थित विधवा / परितक्ता घटस्फोटीत महिला आणि दिव्यांग महिला पुरुष / आजारग्रस्त महिला पुरुष / वयोवृद्ध महिला पुरुष / सुशक्षीत बेरोजगार युवक युवती अश्या २८ लाभार्थीची नोंदणी विस्तार प्रमुख व हेमत बाविस्कर सह संघटक प्रमुख यांच्या अथक प्रयत्नाखाली लाभार्थीची नोंदणी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव बडगुजर यांनी केले यावेळी दिव्यांग मुलींना प्रत्येकी त्यांनी ५१ रु बक्षीस म्हणून दिले तर कार्यक्रमाची रूपरेषा हेमंत बाविस्कर सह संघटन प्रमुख यांनी मांडली यावेळी मार्गदर्शन पर भाषणात अरुण पाटील यांनी मागणी व मार्गदर्शन यामधील फरक स्पष्ट करतांना वरील विविध योजना बाबत सविस्तर पणे अनमोल असे मार्गदर्शन करत योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अश्वासन दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणेश आनंदा व जितेंद्र सोळंके यांनी केले यावेळी मायाबाई हिवर उपसरपंच व रेखाबाई सोळके ' वैजयंता बाईधिवर 'आशा सोळंके.रामकृष्ण सोळंके,निलेश सोळंके ग्राप सदस्या सह गावातील बहुसंखेने लाभार्थी महिला पुरुष मंडळी हजर होती.