विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून धार्मिक स्थळी नेल्याने रावेर लोकसभा, विधानसभा क्षेत्रातील हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित : खासदार,आमदार दखल घेऊन काय कारवाई करणार...?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) भुसावळ येथील सेंट ॲलॉयसिस हायस्कूलने विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून धार्मिक स्थळी नेल्याचे वृत्त आज दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होता बरोबर तसेच संपूर्ण रावेर लोकसभा,विधानसभा मतदारसंघातील हजारो विद्यार्थी सेट आलायसिस हायस्कूलमध्ये दररोज वेगवेगळ्या वाहनांमधून शिक्षणासाठी सेंट ॲलॉयसिस हायस्कूलमध्ये जात असल्याने धर्मवादाचा मुद्दा उपस्थित झाल्याने रावेर लोकसभा व विधानसभेतील  सत्ताधारी पक्षातील दमदार, जबाबदार लोकप्रतिनिधी खासदार रक्षाताई खडसे,आमदार अमोल भाऊ जावळे हे आपला हिंदुत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन घडलेल्या घटनेची दखल घेऊन काय कारवाई करणार..? याकडे आता संपूर्ण लोकसभा विधानसभा क्षेत्रासह उत्तर महाराष्ट्राचे लक्ष वेधून आहे.

(ads)

भुसावळ येथील सेंट ॲलॉयसिस  हायस्कूलमध्ये यावल शहरातील अंदाजे २०० ते ३०० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दररोज वेगवेगळ्या वाहनाने जात आहेत प्रमाणे संपूर्ण रावेर लोकसभा विधानसभा क्षेत्रातील अनेक विद्यार्थी सेंट ॲलॉयसिस हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. 

 (ads)

परंतु सेंटॲलॉयसिस हायस्कूलने  ११ सप्टेंबरला नववीच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांची शहरात धार्मिक सहल काढली त्यात मुलींना स्कार्फ ( हिजाब प्रमाणे चेहरा झाकून ), तर मुलांना डोक्यावर रुमाल बांधून एका धार्मिक स्थळी नेले.ही माहिती मिळतात हिंदुत्ववादी संघटना व पालकांनी शनिवारी भुसावळला शाळा गाठून संतप्त होऊन जाब विचारला धार्मिक सलोख्याच्या नावाखाली मुलांचे ब्रेन वॉश करण्याचा हा आत्मचिंतन करणारी,घटना  असल्याचा आरोप केला जात आहे.

(ads)

हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींना सेंट ॲलॉयसिस शाळा गाठून प्राचार्य सिस्टर शिला व संबंधित शिक्षक अमोल धंदाले यांच्या सोबत चर्चा केली.शाळेतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी ११ सप्टेंबरला धार्मिक सलोखा सहल काढण्यात आली यासाठी मुलांकडून शंभर रुपये शुल्क मात्र मुलींना चेहऱ्यावर स्कार्फ बांधून तर मुलांना डोक्यावर रुमाल बांधून धार्मिक स्थळी का नेले.? तसेच मंदिरात जाताना मुलांच्या कपाळावर टिळक का केला नाही.? अशी विचारणा केली यावेळी श्याम दरगड,भारतीय वैष्णव, शिवसेनेचे दीपक धांडे,भाजपाचे शिशिर जावळे उपस्थित होते.

(ads)

 त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. ही मागणी लक्षात घेता रावेर लोकसभा खासदार रक्षाताई खडसे,रावेर विधानसभा आमदार अमोल भाऊ जावळे हे आपला व आपल्या पक्षाचा हिंदुत्वाचा मुद्दा  आणि शैक्षणिक क्षेत्रातील धर्मवादाचा मुद्दा लक्षात घेता काय कारवाई करणार याकडे संपूर्ण लोकसभा विधानसभा क्षेत्रासह उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!