रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे कडधान्य, ज्वारी, मका व कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे करण्यात आली आहे.
(ads)
शेतकरी वर्ग सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून त्यांना केवळ नुकसानभरपाईच नव्हे तर तात्काळ अंतरिम मदत मिळणे गरजेचे आहे. येत्या आठवड्यातच शेतकऱ्यांना संसाराचा गाडा चालविण्यासाठी किमान आर्थिक सहाय्य देण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, केळी पिक विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या मंडळांची घोषणा करून विम्याच्या दाव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट व तात्काळ जमा करण्याची आवश्यकता आहे. विमा रक्कम तत्काळ उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात मोठा दिलासा मिळेल.
(ads)
या सर्व मागण्यांवर शासनाने सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अश्या सर्व मागण्यांचे निवेदन रावेर येथे तहसील कार्यलय येथे दिले सोबत
डॉ. राजेंद्र पाटील(तालुकाध्यक्ष काँग्रेस) श्री.किशोर पाटील(तालुकाध्यक्ष शरद पवार गट) श्री.नितीन महाजन (तालुकाध्यक्ष ऊ.बा.ठाकरे शिवसेना गट) श्री.प्रल्हाद महाजन,श्री.प्रल्हाद बोंडे,श्री.सोपान पाटील,श्री.योगीराज पाटील,श्री.लक्ष्मण मोपारी,श्री.सुनिल कोंडे, श्री.योगेश पाटील,श्री.अशोक शिंदे,श्री.धुमा तायडे,श्री.नरेंद्र पाटील,श्री.ललित पाटील,श्री.नीलकंठ चौधरी,श्री.समाधान महाजन,श्री.भुपेंद्र जाधव,श्री.सुधाकर महाजन,श्री.यशवंत धनके,श्री.ऍड योगेश गजरे,श्री.राहुल पाटील,श्री.रामदास लहासे,श्री.संतोष महाजन,श्री.जितेंद्र नेमाडे,श्री.युवराज नेमाडे,शेख मंजूर शेख कादर,श्री. धिरज तायडे,सउद शेख,श्री.विवेक महाजन,सैय्यद अफसर,श्री. श्याम भालेराव,श्री.व्हाय.एस. महाजन,श्री.बाळू केळकर,शेख लतीफ शेख सय्यद,श्री.संतोष पाटील,श्री.चेतन पाटील उपस्थित होते.