यावल ( सुरेश पाटील ) शहरात ओला व सुका कचरा संकलन करताना संबंधित ठेकेदार आपल्या सोयीनुसार मर्जीनुसार आपल्या यंत्रणेमार्फत कचरा संकलन करीत असल्याने तसेच मोकळ्या जागांवरील दुर्गंधीयुक्त कचरा कोणीही उचलत नसल्याने यावलकरांमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
(ads)
पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी कचऱ्याचे विलगीकरण महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे यावल नगरपरिषद मार्फत नियुक्त ठेकेदार हा यावल शहरातील सुका कचरा आणि ओला कचरा संकलन करताना वेगवेगळ्या संकलन करीत नसल्याने तसेच शहरातील ओला सुखा कचरा संकलन करताना शहरातील प्रत्येक घरावरील ऑनलाइन स्कॅन करण्याचे काम कचरा संकलन करणाऱ्या वाहनधारकाकडे व कचरा संकलन करणाऱ्या मजुराकडे दिले जात असल्याने कॉन्ट्रॅक्टर आपल्या सोयीनुसार मर्जीनुसार कचरा संकलन करण्याचे काम करीत असून पद्धतशीरपणे मुख्याधिकारी यांच्याशी संगणमत करून आपल्या ठेकेदारीचे बिल मिळवून घेत आहे याकडे तसेच यावल शहरात ठिकठिकाणीच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने ही मोकळ्या जागांवरील घाण कोण उचलणार..? असा प्रश्न यावल शहरात उपस्थित केला जात असेल यावलकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
(ads)
ओला व सुका कचरा संकलन करताना प्रभावीपणे सामग्रीचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर करू शकतो,लँडफिल्सवरील भार कमी करू शकतो आणि प्रदूषण रोखू शकतो. याव्यतिरिक्त, ते हरितगृह वायू उत्सर्जन कमी करते आणि माती आणि भूजल प्रदूषणाची शक्यता कमी करते.
(ads)
ओला कचरा म्हणजे अन्नपदार्थ आणि इतर सेंद्रिय पदार्थ,तर सुका कचरा म्हणजे बाटल्या,कागद, प्लास्टिक आणि धातू यांसारखे पुनर्वापर करण्यायोग्य किंवा नैसर्गिकरित्या विघटन न होणारे पदार्थ आहेत,ओला कचरा कंपोस्ट करण्यासाठी वापरला जातो,तर सुका कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो.या कचऱ्याचे विलगीकरण यावल नगरपरिषदेचा ठेकेदार शासनाच्या अटी साठी प्रमाणे करीत आहे का ..? कचरा संकलन करण्यासाठी ठेकेदाराकडे किती वाहने आणि मजूर आहेत..? कचरा संकलन करताना प्रत्येक घराचे स्कॅनिंग कोण करीत आहे.? ठेकेदाराच्या इत्यादी कामकाजामुळे पर्यावरणाचे रक्षण होत आहे किंवा नाही.? यावल नगरपरिषदेचे कचरा व्यवस्थापन कार्यक्षम आहे किंवा नाही.. याबाबतची खात्री यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुख करीत आहेत का..? नगरपरिषद मुख्याधिकारी आपल्या मुख्यालयात आणि नगरपरिषदेच्या कार्यालयीन वेळेत किती वेळ उपस्थित राहतात..?
(ads)
प्रदूषण महामंडळाने यावल नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला कधी भेट दिली.? प्रकल्पाची पाहणी करून कार्यवाही काही कार्यवाही केली..? आहे किंवा नाही.? याकडे नगरपालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी यांचे यावल नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराकडे दुर्लक्ष होत असल्याने यावल शहरात प्रशासनाबाबत तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून यावल शहरातील ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त कचरा तात्काळ उतरण्याची कार्यवाही करावी अशी सर्व स्थलांतून मागणी होत आहे.
शहरात फालकनगर,गंगानगर, यावल पंचायत समिती कार्यालयाच्या मागील बाजूस, भास्कर नगर,तिरुपतीनगर,देशमुखवाडा,पोलीस स्टेशन आजू बाजूचा परिसर,इत्यादी ठिकाणासह अनेक ठिकाणी खाजगी प्लॉट परिसरात सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर, जागेवर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे याची कोण साफसफाई करणार..? असा प्रश्न यावल शहरात उपस्थित केला जात असून काही संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हा सर्व ठीक ठिकाणचा कचरा एका ट्रॅक्टर मध्ये भरून मुख्याधिकारी यांच्या दालनात टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा यावल शहरात आहे.त्यामुळे प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.



