यावल ( सुरेश पाटील )
प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद अंतर्गत उपकेंद्र राजोरे तालुका यावल येथे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन भायेकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता .
(ads)
सदर कार्यक्रमांमध्ये सदर कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय अधिकारी डॉ.भावेश जावळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली व त्यांनी अभियानाची माहिती रुग्णांना दिली.सदर अभियानांतर्गत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या गावांमध्ये 55 रुग्णांची थुंकी व एक्स-रे तपासणी करण्यात आली.
(ads)
याप्रसंगी उपसरपंच दिनेश पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष सागर कोळी, भाजपाचे मधुकर नारखेडे, मयूर महाजन, उपस्थित होते.
डॉ. अर्चना पाचपोडे , डॉ. जाकीर पिंजारी , डॉ पंकज पाटील,डॉ. हर्षल चौधरी यांनी तपासण्या केल्या सोबत वैद्यकीय सहाय्यक अल्ताफ देशपांडे, नितीन जगताप, सतीश बोरोले, लता चौधरी, जागृती महाले, शुभम चौधरी, असलम तडवी, क्षयरोग पर्यवेक्षक मिलिंद राणे, आरोग्य सेविका वैशाली महाजन व आशा स्वयंसेविका आशा भरत पाटील उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले🙏



