रावेर तालुक्यातील विवरे बु येथे टाळ - मृदंगाच्या गजरात दुर्गा विसर्जन मिरवणुक ! श्री सावतामाळी दुर्गा मंडळाचा आदर्श उपक्रम !

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर(प्रतिनिधी )तालुक्यातील विवरे बु॥ येथील श्री संत सावता माळी नवदुर्गा उत्सव मंडळाने दुर्गा विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांना किंवा डिजेला थारा न देता पारंपारिक वादय तसेच टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाला महत्व दिले . दुर्गा विसर्जन मिरवणुकीला डिजेच्या कर्कशा आवाजावर विभत्स नाच न करता त्या ठिकाणी टाळ करी मंडळ सांगुन विसर्जन मिरवणुक काढण्याचा आदर्श निर्णय सावता माळी मंडळा घेतला होता.

      श्री सावता माळी महाराज दुर्गा उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीत शेगांव गजानन महाराज भजनी मंडळ व संत सावता महाराज महिला भजनी मंडळाने सहभाग घेवून टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करित विसर्जन मिरवणुक आनंदात संपन्न झाली. यावेळी भजनी मंडळांनी लयबद्ध पावली खेळली . जोगवा , भारुड ,गवळणी म्हणत आनंद लुटला. यामुळे भक्तीमय वातावरण झाले.विद्युत रोषणाई वरिल छत्र्यांच्या लख्ख प्रकाशात मिरवणुकीचे विलोभणीय दृष्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. या आदर्श मिरवणुकीमुळे आयोजक मंडळाचा गौरव करण्यात येणार आहे.

....... ...........................

मुलींनी सादर केले नृत्य....

    कु. देवयानी सपकाळ , कु.कृष्णाली सणंसे, कु.उन्नती हरमकार, कु विनिता जुनघरे , कु तेजल सणंसे यासह मुलींनी भाव गीत व जोगवा म्हणत सुंदर नृत्य सादर केले.

   कार्यक्रमासाठी माजी सरपंच वासुदेव नरवाडे, गुरुवर्य प्रभाकर सपकाळ, काशिनाथ खुर्दै , तुळशिराम सपकाळ, विलास सपकाळ, माजी सरपंच सौ आशा नरवाडे , सदस्या सौ निलीमा सणंसे , सौ ज्योती सपकाळ, सौ येनुबाई सपकाळ, सौ संगिता सपकाळ, ज्ञानदेव सणंसे, भागवत सणंसे , टिकाराम जुनघरे, मयुर खुर्दे , देवेंद्र सपकाळ, गणेश सपकाळ, संजय पुनतकर, यासह मान्यवरांनी सहभाग घेतला.  

दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र खुर्दे , महेश खुर्दै , भानुदास महाजन , दिपक सपकाळ , योगेश महाजन , युवानेते युवराज जुनघरे , सचिन सपकाळ ,प्रल्हाद जुनघरे, सनी खुर्दे , गणेश डोंगरे , प्रसाद नरवाडे, प्रमोद सणंसे , दिनेश माळी , हर्षल वाघ, गोपाळ जुनघरे , हितेश जुनघरे , पुंडलीक नरवाडे , हर्षल सपकाळ, महेंद्र सावळकर, सागर खुर्दे, निखिल सावळकर , योगेश सपकाळ , लक्ष्मण सावळकर , जिवन वाघ, यश सणंसे, भुषण सावळकर , नितिन धनोळे, दिपक सणंसे, यश खुर्दे , मोहित सणंसे, गणेश खुर्दे, तुषार सपकाळ, चेतन सपकाळ, इश्वर इंगळे , राहूल सावळकर , निखिल मारूळकर , ललीत सपकाळ , गौरव सपकाळ , सौरव सपकाळ , भगतसिंग नरवाडे , निलेश जुनघरे, स्वप्नील सपकाळ, किरण सपकाळ , आकाश काठोळे, अमर दांडगे , गणेश जुनघरे , अक्षय जुनघरे यासह मंडळाचे कार्यकर्त्यiनी मिरवणुक यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

   श्री सावता माळी महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष मनिषा सपकाळ, सौ उषा सपकाळ , सौ अंजनाबाई हरमकार, सौ वंदना महाजन, सौ गंगूबाई वाघ, कांचन सपकाळ, सौ मंगला दांडगे , सौ सविता सपकाळ , सौ मंगला सावळकर , सौ नंदा सणंसे, सौ ललीता वासनकर , सौ शोभा जुनघरे, सौ मनिषा महाजन, सौ सुरेखा खुर्दे, सौ दुर्गा सावळकर , सौ दिपाली पुनतकर, सौ मनिषा खुर्दे यासह महिला भजनी मंडळाने भजने म्हणत पावली खेळत रंगत आणली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!