रि - टेंडर काढले पण, शुद्धिपत्रक हे जावक क्रमांक,व तारखेवीणाच : रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द ग्रामसेवकाचा प्रताप : ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 टेंडरिंग प्रक्रियेमध्ये अंदाधुंदपणे कार्य करणाऱ्या खीर्डी खु ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी

रावेर (राहुल डी गाढे) : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास या योजनेअंतर्गत रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात विकास कामे करण्यासाठी टेंडरिंग प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु दिवसेदिवस टेंडरिंग प्रकिया अपारदर्शक होताना दिसून येत आहे.

(ads)

सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द ग्रामपंचायत कडून "अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास या योजनेअंतर्गत" विकास कामे करण्यासाठी 2025_JALGA_1234064_1 ही इ  निविदा काढण्यात आली होती. परंतु ग्राम सेवक हे त्यांच्या सोयीच्या लोकांनाच सदर टेंडर मिळायला पाहिजे जेणेकरून त्यांना घोळ करून मलिदा खायला बरे होईल. 

(ads)

या उद्देशाने कार्य करत आहे.असाच प्रताप रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द ग्राम सेवकाने केल्याचे निदर्शनास आले आहे.आणि रावेर तालुक्यातही असे होताना दिसून येत आहे.कारण आपण जर गेल्या दोन वर्षाचा अभ्यास केला तर आपल्या निदर्शनास येईल की या टेंडरिंग प्रक्रियेमध्ये फक्त ठराविकच मक्तेदार या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. आणि दुसरे मक्तेदार सहभागी झाल्यास टेंडर होतो परत रि टेंडर. यांचाच प्रत्यय रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द ग्राम सेवकाने काढलेल्या टेंडर चा प्रत्यय आला आहे. 2025_JALGA_1234064_1 या टेंडर चा प्रत्यय आला आहे. हा टेंडर रद्द करतांना प्रशासकीय कारण ग्रामसेवकांच्या वतीने देण्यात आले आहे आणि टेंडर रि टेंडर करण्यात आहे.

(ads)

परंतु सदर ग्रामसेवकाने रि टेंडर करण्याचे कारण देत एक पत्र अपलोड करण्यात आहे. त्या पत्रावर ना दिनांक आहे,ना जावक क्रमांक आहे.मग ग्रामसेवक हे कार्य करतात तरी काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.तरी रावेर पंचायत समिती बी डिओ,जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे खिर्डी खुर्द ग्रामसेवकाने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल काय कारवाई करतात ? हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे. रावेर तालुक्यात टेंडरिंग प्रक्रियेत दिवसेंदिवस घोळ होताना दिसून येत आहे तश्या तक्रारी सुद्धा आधीच दाखल आहे.तरी जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .



#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!