दुःखद बातमी : दिलीप मोतीराम लहासे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
खिरवड (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिवंगत - दिलीप मोतीराम लहासे रा. खिरवड ता. रावेर जि.जळगाव यांचे वयाच्या 59 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांच्या राहत्या घरून खिरवड ता. रावेर येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 6 भाऊ, 2 बहिणी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत दिलीप मोतीराम लहासे हे एडवोकेट प्रदीप लहासे यांचे मोठे बंधू होते. तसेच, बाळू मोतीराम लहासे शिक्षक यांचे मोठे बंधू होते.
त्यांच्या चित्तास चिरकाळ शांती मिळो..भावपूर्ण आदरांजली.



