ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागामार्फत प्राचार्य डॉ जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर मार्गदर्शनवर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रज्वल पाटील यांनी सध्या आय टी विभागची मार्केटला असलेली परिस्थिती तसेच मुलाखतीसाठी कशा पद्धतीनी तयारी करावी हे सांगितले. तसेच प्रा मिलिंद भोपे यांनी नवीन टेक्नॉलॉजी अवगत करून आपले ज्ञान वाढवावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा वैष्णवी पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री श्रेयस पाटील श्री हर्षल पाटील श्री अनिकेत पाटील यांनी मेहनत घेतली
ऐनपूर महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागामार्फत करिअर मार्गदर्शन
मंगळवार, जानेवारी २०, २०२६



