रावेर-पुनखेडा–पातोंडी रस्त्याचे काम अपूर्ण; धुळीमुळे शेतकरी व नागरिक त्रस्त

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

रावेर तालुक्यातील रावेर-पुनखेडा–पातोंडी हा महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर टाकलेला खळी मुरूम व सैल मातीमुळे वाहनांची वर्दळ वाढताच मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून परिसर धुरकट झाल्याचे चित्र आहे.

(ads)

या उडणाऱ्या धुळीचा मोठा फटका रस्त्यालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. पिकांवर धूळ साचत असल्याने पिकांची वाढ खुंटत असून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

(ads)

“रस्त्याचे काम सुरू केले पण पूर्ण केले नाही. आमच्या शेतातील पिकांवर सतत धूळ बसत आहे. यामुळे पिके खराब होत असून कोण जबाबदार आहे?” तर दुचाकीस्वार नागरिक श्री.कौशल पाटील म्हणाले, “धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नाही. डोळ्यांना जळजळ होते आणि अपघात होण्याची भीती कायम असते.”

(ads)

पुनखेडा पातोडी महिला ग्रामस्थ यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले, “लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”

अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे ना सुरक्षित वाहतूक होत आहे ना शेतकऱ्यांचे नुकसान थांबत आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करून डांबरीकरण करावे व धुळीचा त्रास थांबवावा, अशी जोरदार मागणी पुनखेडा, पातोंडी व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!