ऐनपूर महाविद्यालयाच्या रासेयो विशेष संस्कार शिबिरला सुरुवात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संस्कारांची शाळा: प्राचार्य डॉ जे बी अंजने 

ऐनपूर:सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर विटवा येथे आजपासून दिनांक २/०१/२६ पासून सुरुवात होवून दिनांक ०८/०१/२६ पर्यंत राहणार आहे. या शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सैनिक स्वर्गवासी बाबुराव बंडू अंजने यांचे सुपुत्र व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी एन.एस.एस. गीत सादर केले . शिबिरांर्थीनी कसे बोलावे, कसे वागावे, कसे राहावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संस्कारांची शाळा आहे.

(ads)

या शिबिरात सहभागी होऊन व्यक्तीमत्व विकास साधायचा आहे.श्रमदान आणि वैचारिक प्रबोधनातून आपला सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश या शिबिराचा आहे असे मत त्यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष पदी गंभीर सेनु चौधरी (संचालक वि.का. सोसायटी विटवा) हे होते. या उद्घाटन समारंभाला संस्थेचे उपाध्यक्ष रामदास नारायण महाजन यांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे असे सांगितले.

(ads)

 या उद्घाटन समारंभाला संस्थेचे चेअरमन माननीय श्रीराम नारायण पाटील, संस्थेचे संचालक विकास दत्तात्रेय महाजन, विजय जगन्नाथ पाटील, प्रकाश राजाराम चौधरी, सहसचिव आर एस पाटील व महाविद्यालय विकास समिती सदस्य पांडुरंग बाजीराव पाटील उपस्थित होते. तसेच विटवा गावाचे प्रथम नागरिक नागरिक मुकेश विश्वनाथ चौधरी सरपंच ग्रामपंचायत विटवा, एकनाथ डी पाटील मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विटवा, बाळू श्रीराम पवार पोलीस पाटील विटवा, माननीय विजय जयराम चौधरी चेअरमन वि.का. सोसायटी विटवा हे उपस्थित होते. 

(ads)

या समारंभाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विटवा गावातील नागरिक ग्रामपंचायत कार्यालयातील सदस्य जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. पी. उमरीवाड सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी केले. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक डॉ. व्ही. एन.रामटेके प्रमुख कार्यक्रम अधिकारी यांनी केले. व मान्यवरांचे आभार डॉ. रेखा पी. पाटील महिला कार्यक्रम अधिकारी यांनी मानले. व शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने उद्घाटन समारंभाचा समारोप करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!