शेगाव:- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय विश्राम गृहाच्या सभागृहात नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेची बैठक
संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे हे अध्यक्ष स्थानी होते. तसेच मुख्य मार्गदर्शक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार, प्रमुख उपस्थितीत किरण उपाध्याय, राज्य संघटक पदमा मोहड हे होते.
बैठकीची सुरवात क्रांतिज्योती सावित्री फुले यांची जयंती साजरी करून केली. त्यावेळी उपस्थित राज्य संघटक पदमा मोहड यांनी देशातील पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करण्यात आले.
बैठीला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
त्यामध्ये रवि शेगोकार, जसवंत बहादुरे, कैलास खराटे, जफर खान, नागेश भटकर, अनिल खराटे, डॉ. कपिल मुन, गौतम इंगळे, संजय इंगळे, जुगल सावळे, भीमकिरण दामोदर, विजय टेंभुर्णे, पंकज मुनेश्वर, अमीन शेख, अनिल सवादेकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर पत्रकार बैठकीला उपस्थित होते.
बैठकीस शेगाव शहर व तालुका कार्यकारणी यांनी परिश्रम घेतले.शेवटी आभार प्रदर्शन रवी शेगोकार यांनी केले.




