भुसावळ : भुसावळ तालुक्यातील पोलीस उप अधीक्षक केदार बारबोले यांचा नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम कडून " जग बदलविणारा बाप माणूस डॉ.बाबासाहेब आंबेडकर," लेखक जगदीश ओहोळ लिखित पुस्तक सप्रेम भेट देऊन त्यांच स्वागत करण्यात आले. तर पोलीस स्थापना दिना निमित्त उप अधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व पुजा अंधारे यांच्या सह उपस्थित सर्व पोलिसाना पोलीस स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम वतीने प्रकाश सरदार, उतर महाराष्ट्र सदस्य राजेश तायडे,जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे, जिल्हा उपाध्यक्ष सुमित निकम,भुसावळ तालुका अध्यक्ष चंद्रशेखर निकम, यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर तायडे, इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.
नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम तर्फे भुसावळ तालुक्यातील पोलिस उप अधीक्षक केदार बारबोले यांचे सत्कार आणि स्वागत
शुक्रवार, जानेवारी ०२, २०२६




