जळगाव :- आज जगात माणसा माणसात प्रचंड राग , द्वेष , मोह वाढलेला. आहे , माणसा माणसात संघर्ष वाढत आहे , या संघर्षातून विनाश घडत आहे अश्या प्रसंगी प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सुखाने , शांततेने , निर्भयतेने जगता येण्या करिता भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या मैत्री , करुणा या तत्त्वांचा अंगीकार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बुद्ध चतु परीसा भिक्खुनी संघ , थायलंड च्या प्रमुख पूज्य भिक्खुनी विसुत्ती याना यांनी केले .
(ads)
अजिंठा हौसिंग सोसायटी च्या मैदानात झालेल्या जाहीर धम्मदेसना प्रसंगी जनतेस संबोधित करताना अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या .
विसूत्ती याना यांनी पुढं सांगितले की बौद्ध धर्माचा प्रचार , प्रसार करण्या करिता थायलंड , ब्रम्हदेश , श्रीलंका आदी देशांमध्ये भिक्खुनी मोठ्या संख्येने पुढं येत आहेत .
(ads)
या प्रसंगी पूज्य भिक्खुनी वीसुत्ती याना यांचा जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ , ॲड. आनंद कोचुरे , संघमित्रा चव्हाण , ज्योती भालेराव , चेतन नन्नवरे , दिलिप सपकाळे , कविता सपकाळे , यांच्या हस्ते मानचिन्ह , मानपत्र , चिवर , बुके देऊन सन्मान करण्यात आला . या प्रसंगी उपस्थित सर्व जनतेने उभे राहून त्यांना अभिवादन केले .
या प्रसंगी मंचावर विज्जा विमुत्ती , चिरावरना , समुद तेजना , वितक्का विचारा, विशाखा , अभिन्ना , सुनंदा बोधी , करुणा शिला ई. बौद्ध भिक्खुनी उपस्थित होत्या .
जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी भूमिका विषद केली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका व श्रामणेरी संघमित्रा चव्हाण यांनी केले .
(ads)
अजिंठा हाउसिंग सोसायटी चे चेअरमन दिलिप सपकाळे यांनी परिचय करून दिला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव, मानपत्राचे वाचन गीता सोनवणे , परिचय ममता सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. आनंद कोचुरे यांनी केले .
प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या बा तथागता या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वर्षा कोचुरे , रजनी सैंदाणे , पूनम वानखेडे , अर्चना पवार , सुनंदा वाघ , नूतन तासखेडकर , विजया शेजवळे, भारती सपकाळे , मनीषा भालेराव , सुनंदा सैंदाणे, सविता सोनवणे , पूजा कोचुरे , पूजा भालेराव , चारुशीला सुरडकर , सुमन बैसाने यांनी परिश्रम घेतले.
(ads)
सुरवातीस भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रि सरण , पंचशील ग्रहण करण्यात आले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती ते अजिंठा चौक पर्यंत धम्म रॅली काढण्यात आली . या नंतर सर्व भिक्खुनी यांनी अजिंठा सोसायटीतील प्रत्येक घरी जाऊन चारिका केली . या सर्व कार्यक्रमात पाचशे किलो फुलांची उधळण करण्यात आली. जागोजागी रांगोळी काढून रस्ते सुशोभित करण्यात आले होते . या समारंभास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोक आले होते .



