ऐनपुर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती मा. प्राचार्य डॉ जे. बी. अंजने यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ एस ए पाटील व उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव हे होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर व विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले. 

(ads)

सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न या विषयावर विचार मांडले तर उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर विषयी माहिती दिली. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ जे. बी. अंजने यांनी सावित्रीबाई फुले यांनी समाजाच प्रचंड असा विरोध पत्करून महिला सबलीकरासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले व प्रत्येक विद्यार्थिनी हे त्यांचे कार्य लक्षात घेऊन आपली शैक्षणिक वाट चाल करावी असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवसरमल हिने केले तर आभार प्रदर्शन नेहा महाजन हिने केले. 

(ads)

या कार्यक्रमाला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर, डॉ. पी. आर. महाजन, डॉ.एस. बी. पाटील, प्रा.एस. बी. महाजन, प्रा व्हि. एच. पाटील, डॉ. पी. आर. गवळी, डॉ. संदीप साळुंके, प्रा प्रदीप तायडे, प्रा अक्षय महाजन, डॉ जे.पी. नेहेते, डॉ डी. बी. पाटील, श्री गोपाल पाटील, श्री सुनील पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री हर्षल पाटील, श्री सौरभ पाटील श्री ऋषिकेश महाजन यांनी मेहनत घेतली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!