सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एकका अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर विटवा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. मार्गदर्शन करताना प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस पी उमरीवाड यांनी सावित्रीबाईंनी शिक्षिकेचं केलेलं कार्य महान आहे ते महिलांना प्रेरणादायी ठरले आहे असे सांगितले. तसेच महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पी पाटील यांनी सावित्रीबाईंच्या परिश्रमातून महिलांना गुलामगिरीतून मुक्त केले असे सांगितले तसेच स्वयंसेवकांनी सुद्धा त्यांची मनोगते व्यक्त केली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल सुतार यांनी केले व आभार प्राचल विनोद कोळी या स्वयंसेवीकेने केले. या कार्यक्रमाला सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर विटवा येथे सावित्री माई फुले यांना अभिवादन
रविवार, जानेवारी ०४, २०२६



