यावलमध्ये घडले माणुसकीचे दर्शन : हरवलेला मोबाईल प्रामाणिकपणे केला परत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनिधी : राहुल जयकर 

गोलू यावल कटिंग वाले यांचा मोबाईल हरवला होता. सदर मोबाईल आज दिनांक 05 जानेवारी 2026 रोजी हाफीज सब्दर पटेल (रा. विरार नगर, यावल) यांना यावल बस स्टँडच्या मागील परिसरात सापडला. त्यांनी माणुसकीच्या नात्याने व प्रामाणिकपणाचे उदाहरण ठेवत तो मोबाईल संबंधित मालक गोलू कटिंग वाले यांना त्वरित परत केला.

(ads)

या घटनेमुळे यावल शहरात माणुसकीचे सुंदर दर्शन घडून आले आहे. यावेळी पटेल बाबा यांनी सांगितले की, “ज्यांची वस्तू आपल्याला सापडते ती प्रत्येकाने परत केली पाहिजे. एखाद्या व्यक्तीची वस्तू हरवल्यावर होणारे दुःख आपण समजून घेतले पाहिजे. हरवलेली वस्तू परत मिळाल्यावर जो आनंद मिळतो, तो खरा समाधान देणारा असतो.”

(ads)

मोबाईल परत मिळाल्यानंतर गोलू कटिंग वाले यांनी हाफीज सब्दर पटेल व.बशिर तडवी जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यांचे मनापासून आभार मानले. “शब्दात व्यक्त करता येणार नाही असे माणुसकीचे कार्य त्यांनी केले आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वृद्ध वयातही दाखवलेली ही माणुसकी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!