महाराष्ट्र राज्य "सावित्री शक्तीपीठ पुणे " यांच्या माध्यमातून वरणगाव येथे शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा सेवानिवृत्त तहसीलदार अरुण महाजन यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. जिल्ह्यातील सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या विवरे बु॥ मा.सरपंच सौ आशा वासुदेव नरवाडे यांचेसह आठ महिलांना "सावित्री शक्तीपीठ पुरस्काराने " सन्मानित करण्यात आले.
(ads)
याप्रसंगी गुरुवर्य विश्वास महाजन ( वाघोड ), एस बी महाजन सर( रावेर ) , के एस महाजन (पाचोरा), लेखक पी जी चौधरी ( एरंडोल ), हभप मालती महाराज, हभप विलास महाराज, उल्हास पवार ( जामनेर ), बुरहानपुर माळी समाज अध्यक्ष प्रभाकर चौधरी, माळी पंच मंडळ अध्यक्ष संजय माळी (वरणगाव ), वासुदेव नरवाडे ( विवरे ) , रावेर नगराध्यक्षा सौ संगीता महाजन , बोदवड नगराध्यक्षा सौ माया माळी,सुभाष महाजन (साकळी), रमेश महाजन , संजय माळी मुक्ताईनगर, या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
(ads)
यावेळी विवरे येथील सविता नरवाडे , मनिषा महाजन, ललीता इंगळे , लता नरवाडे , सरला खुर्दे, कितीं नरवाडे , प्रदिप सपकाळ, लखीचंद जिरी, सुभाष महाजन सह मान्यवर, बहुसंख्येने महिला व समाज बांधव उपस्थित होते.



