जामनेर तालुक्यातील शहापूर धरण परिसरात डंपर–दुचाकी अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, डंपर चालक फरार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


डंपरची दुचाकीला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार

जळगांव जिल्हा प्रतिनिधी (नितीन इंगळे)

शहापूर धरण परिसरात आज सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. डंपरने मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिली असून या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण मोटारसायकलवरून जात असताना वेगाने आलेल्या डंपरने त्याला धडक दिली. धडक दिल्यानंतर डंपर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे. अपघात इतका भीषण होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. फत्तेपूर पिंपरी येथील तरुण असल्याची माहिती मिळाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!