मुंबई : येथील स्टेटस हॉटेल, विधानसभा नरिमन पॉईंट मुबई येथे नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम ची बैठक राष्ट्रीय सचिव प्रकाश सरदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याचवेळी प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय संघटक दिनेश इखारे, राज्य सचिव टी.एस.भाजेकर,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे, सल्लागार व मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार दादाभाऊ अभंग हे उपस्थित होते.
मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी भीमराव शापाने, ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी सुधीर तायडे, पालघर जिल्हा अध्यक्ष पदी दिलीप अवसरमल तर जिल्हा सचिव दीपक जेस्वार यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकारीचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
बैठकीचे सूत्रसंचलन टी. एस. भाजेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश तायडे यांनी केले.



