महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जंतर-मंतरवर 12 फेब्रुवारी पासून बौद्धांचा एल्गार - आ.राजकुमार बड़ोले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



नवी दिल्ली | प्रतिनिधी

महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी येत्या 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे देशव्यापी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात देशभरातून हजारो बौद्ध बांधव सहभागी होणार असून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची ठाम मागणी केली जाणार आहे.

(ads)

यासंदर्भात बोलताना आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, महाबोधी येथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, हे संपूर्ण जग मान्य करतं. मात्र आज त्या पवित्र स्थळी बुद्धांना स्थान नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे असणं आवश्यक आहे. या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

(ads)

आमदार राजकुमार बडोले यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, त्यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली असून, मंत्री रामदास आठवले यांनीही विविध स्तरांवर भेटी घेऊन हा विषय सरकारपुढे मांडला आहे.

 (ads)

     दरम्यान, संघरत्न भंते यांनी सांगितले की, दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी जागृती यात्रा आम्ही महाराष्ट्रात काढली होती. बौद्ध अनुयायांमध्ये जनजागृती करणं हाच आमचा उद्देश आहे. 1949 चा बिहार मंदिर व्यवस्थापन कायदा हा कसा अन्यायकारक आहे, हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं.

(ads)

        ते पुढे म्हणाले, महाबोधी येथील बुद्धविहार बुद्धांच्या ताब्यात यावा हे सरकार मान्य करत नाही, ही गंभीर बाब आहे. बौद्धांच्या विहारात इतर धर्मीयांचे नियंत्रण का, हा आमचा मूलभूत प्रश्न आहे. याआधी भंते विनयाचार्या यांनी जेव्हा देशव्यापी आंदोलन उभं केलं, तेव्हा त्यांना तब्बल 68 दिवस कारागृहात डांबण्यात आलं होतं.

 (ads)

   12 फेब्रुवारी रोजी जंतर मंतर, नवी दिल्ली येथे होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!