रावेर (राहुल डी गाढे) : रेल्वे स्टेशन रोड रावेर येथील बुद्ध नगरी , शिव कॉलनी या ठिकाणी न.पा.मार्फत सांडपाण्याची व्यवस्था व निचरा व्हावा म्हणून गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे .सदर सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतेही प्रकारचे आउटलेट काढण्यात आलेले नाही. असा आरोप समाजसेवक विशाल मुकुंदा तायडे यांनी केला आहे.
(ads)
आऊट लेट नसल्यामुळे या गटारी मध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे हे पाणी आहे त्याच ठिकाणी साचत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासाची उत्पत्ती झालेली आहे व दुर्गंधी पसरत आहे.
गटारी तुंबल्याने लोकांमध्ये नाराजी
गटारी तुंबल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे, ज्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे.गटारे तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.काही ठिकाणी, गटारींच्या पाण्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे
या गटारी मध्ये पावसाचे पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात साचून डेंगू मलेरिया, साथीला रहिवाशांना समोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या रहिवास्याचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना डेंगू मलेरिया, डायरिया अशा साथ रोगाची परिस्थिती निर्माण झाल्यास यास सर्वस्वी नगरपरिषद रावेर प्रशासन जबाबदार राहील.
(ads)
असा इशाराही यावेळी समाजसेवक विशाल मुकुंदा तायडे यांनी निवेदनाद्वारा दिला आहे. तसेच येत्या 15 दिवसात रावेर नगर पालिकेने नालेसफाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल अशा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला आहे. रावेर नगरपालिका काय ऍक्शन घेते हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे.









