सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फेअर्थसंकल्पावर चर्चासत्र संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



      ऐनपूर:ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावर  चर्चासत्र संपन्न झाले.  चर्चासत्राचे अध्यक्ष स्थान  महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ.एस. एन. वैष्णव  यांनी भूषविले.  प्रा. डी. ए. कोळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  अर्थशास्त्र विभागातील प्रा. व्ही. एच.पाटील  यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्याना अर्थसंकल्प कसा तयार होतो व  कसा लागू होतो आणि तो कसा अंमलात आणला जातो हे सांगितलं.व्यक्तिगत जीवनात  अंदाज पत्रक आणि केंद्रीय अंदाजपत्रक कसे असते ते पटून दिले त्याचबरोबर सद्य स्थितीला अंदाजपत्रकातील महत्वपूर्ण तरतुदींचा उल्लेख करून तिसऱ्या स्थानावर अर्थव्यवस्था जाण्याबाबत असलेले नियोजन स्पष्ट केले. प्रा. ज्ञानेश्वर कोळी यांनी  आपल्या मनोगतमध्ये अर्थसंकल्प कधीपासून सुरू झाला व सर्वात आधी कोणी मांडला याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  आणि  अर्थसंकल्प  मध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण बाबींवर किती खर्च होणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली.  तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थिनी संजना भालेराव हिने अर्थसंकल्प कसा तयार झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या बाबींवर कसा खर्च केला जाणार आहे या बाबत चर्चा केली.प्रा. प्रदिप तायडे प्रा. अक्षय महाजन , प्रा. अंकुर पाटील आणि अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला .अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ.एस. एन. वैष्णव  यांनी केला. आभार प्रा.प्रदिप तायडे यांनी मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे. बी.अंजने यांच्या  मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!