ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात युवती सभा व विद्यार्थी विकास विभागामार्फत आत्मनिर्भर अभियानांतर्गत कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ निखिल वायकोळे व प्रा राहुल नारखेडे उपस्थित होते. डॉ निखिल वायकोळे यांनी अभ्यासाच्या बरोबर कौशल्ये विकास कसे महत्वाचे आहे हे विविध उदाहरण देऊन सांगितले तर प्रा राहुल नारखेडे यांनी संगणक शास्त्र यातील कौशल्ये व ते आत्मसात करण्यासाठी करायचे प्रयत्न या विषयी मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्य विकास कसा साधावा तसेच स्वतः ला नेहमी अपडेट ठेवा व काळाबरोबर चला अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा एस पी उमारीवाड यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा मिलिंद भोपे, प्रा कोमल सुतार, प्रा वैष्णवी पाटील, प्रा धनश्री बखाल हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हर्षल पाटील, श्रेयस पाटील, अनिकेत पाटील यांनी मेहनत घेतली



