सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे आज सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे आज सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. महेंद्र सोनवणे , मराठी विभाग प्रमुख हे होते. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले. याचबरोबर क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या वाङ्मयाच्या सखोल आढावा घेतला . आजमितिला सावित्रीबाई फुले यांचे विचार किती महत्त्वाचे आहेत याबद्दलही त्यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांसमोर मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . या कार्यक्रमात प्रा. कोमल सुतार , संगणक विभाग आणि तृतीय वर्ष कला वर्गाची विद्यार्थिनी संजना भालेराव यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थीनी कुमारी भोई शिवानी हिने केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी , सहकारी प्राध्यापक बंधू ,भगिनीआणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!