विविध मागण्यांसंदर्भात रावेर येथे रस्ता रोको आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :  दि.23 एप्रिल 2026 ,गुरुवार रोजी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब व राष्ट्रीय ओबिसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.चौधरी विकास पटेल सर यांच्या आदेशानुसार केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विरोधात ओबिसी जातीनिहाय जनगणना न करण्याच्या विरोधात, शिक्षकांना टि ई टी परिक्षेतुन सुट न देण्याचा विरोधात व युजीसी बिलाच्या समर्थनार्थ भारत बंद अंतर्गत रावेर शहर बंद करण्यात आले, मुख्य आंबेडकर चौकात जो रोड बुरहानपुर, मुक्ताईनगर, सावदा, फैजपुर या मोठ्या शहरांकडे जाणार्या रस्त्यांना जोडणार्या मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आले.

(ads)

 अर्धा तास भयानक ट्रॅफिक जाम चौकात झाली होती, वरुन रखरखत्या उन्हात ओबिसी कि जातीगत गिनती करो, वर्ना खुर्ची खाली करो, शिक्षकांना टि ई टी परिक्षेतुन मुक्त करा, युजीसी बिल लागु करो, एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण बंद करा, मुस्लीमांची माॅबलिंचिंग बंद करा, ईव्हीएम हटाव देश बचाव ,आदिवास्यांचे सेग्रीगेशन बंद करा व इतर घोषणा देण्यात आल्या, सर्व प्रथम भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नारेबाजी करुन आंदोलनास सुरुवात करण्यात आली.सामाजिक आंदोलन के प्रती ईमानदार लोग आंदोलन चलाते है और ,बेईमान लोग तमाशें देखते है अशा घोषणांनी रावेर शहर दणाणले.

   (ads)

     भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष मा.विशाल भाऊ तायडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले, मार्गदर्शक ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाचे खांदेश विभाग प्रभारी-नितिन गाढे तसेच जिल्हा उपाध्यक्ष महेश तायडे होते, प्रमुख उपस्थितीत कामगार नेते दिलीप कांबळे सर, सामाजिक समता मंच चे उमेश गाढे सर, मौर्य क्रांति संघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र धनगर सर, भारतीय बेरोजगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तायडे सर, मधुकर कुंभार, मौलाना अख्तर साहब, एम आय एम चे तालुकाध्यक्ष वसिमभाई, ढिवरे , रामू रायपुरे , धुमा तायडे, महेंद्र लोंढे सर व शेकडो कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते, रावेर शहरात आंदोलन जबरदस्त यशस्वी झाले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!