दिपनगर भुसावळ येथे गेल्या तिन दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचे दि . ०९ मे रोजी आमरण उपोषणात होणार रूपांतर निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्न पाणी त्याग करण्याचा घेतला निर्णय
भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून औष्णिक विद्युत केंद्रात एस . पी . इंटरप्रायजेस हि एजेंसी कार्यरत आहे . मिळालेल्या माहितीनुसार एजेन्सीचे ठेकेदार सर्रासपणे शासनाची फसवणूक शासनाची आर्थिक लुट व कामगारांचे अर्थीक शोषण करित असल्याचे दिसून येत आहे . ठेकेदाराला असलेले राजकिय पाठबळ तसेच पैश्यांच्या जोरावर पाळीव गुंडांची मदत असल्याने औष्णिक विद्युत केंद्रातिल काही भ्रष्ट अधिकारी यांच्यासोबत संगनमत करून ठेकेदार कामगारांची दिशाभुल तसेच दडपशाही करून कामगारांच्या कष्टाच्या पैश्यांची लुट करित आहे त्याच्या निषेधार्थ दि . ०६ मे २०२६ पासून निळे निशाण संघटनेच्या वतीने दिपनगरच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
(ads)
परंतु दिपनगर प्रशासनातिल काही अधिकारी एस . पी . इंटरप्रायजेस या कंपनिची पाठराखण करीत असल्याचे चर्चेतून लक्षात आल्याने निळे निशाण संघटनेचे प्रमुख आनंद बाविस्कर यांनी दि . ०९ मे २०२६ पासून ठिय्या आंदोलनाचे रूपांतर अमरण उपोषणात करण्याचा निर्णय घेतला आहे संघटनेचे प्रमुख आनंदभाऊ बाविस्कर यांनी कंत्रांटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः अन्न पाणी त्याग करण्याचा निर्णय घेतला असुन जो पर्यंत कामगारांना न्याय मिळवून एस . पी . इंटरप्रायजेस या कंपनिने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई केली जाणार नाही तो पर्यंत अन्न पाणि न स्विकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(ads)
कामगारांची पिळवणुक करणारे ठेकेदार व काही भ्रष्ट अधिकारी यांनी केलेल्या कृत्याच्या निषेधार्थ निळे निशाण कामगार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे तरि सुद्धा दिपनगर प्रशासना कडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याने संघटनेचे प्रमुख आनंद बाविस्कर यांनी दि . ०९ मे २०२६ पासून अन्न पाणी त्याग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे अमरण उपोषणा दरम्यान काही अघटीत घटना घडल्या सर्वस्वी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता तसेच एस . पि . इंटरप्रायजेसचे ठेकेदार जबाबदार राहतील असे संघटनेचे प्रमुख आनंदभाऊ बाविस्कर यांनी सांगितले आहे.
(ads)
तसेच जळगांव जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या संदर्भात गांभिर्य पूर्वक विचार करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष दिपक लोहार निळे निशाण कामगार संघाचे भुसावळ तालुका अध्यक्ष आकाश सपकाळे विभागीय अध्यक्ष रविंद्र कोळीयांच्य वतीने देण्यात आली आहे .


