रावेर येथे विशेष दिव्यांग तपासणी ; २६५ लाभार्थ्यांची तपासणी : आ. अमोल जावळेंचा पुढाकार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि त्यांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जळगावपर्यंत जावे लागू नये, यासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सातत्याच्या प्रयत्नातून आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या सहकार्याने रावेर येथे विशेष दिव्यांग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय, रावेर येथे पार पडलेल्या या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

(ads)

या शिबिरामध्ये एकूण २६५ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या विभागाकडून लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

(ads)

*विभागनिहाय तपासणीचा तपशील*

नेत्ररोग विभाग: ३५ लाभार्थी

अस्थिरोग विभाग: २६ लाभार्थी

मेडिसीन विभाग: २६ लाभार्थी

कान, नाक, घसा विभाग: १८ लाभार्थी

मनोविकार (मानसोपचार) विभाग: १२ लाभार्थी

बालरोग विभाग: ०८ लाभार्थी

(ads)

"दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी कटिबद्ध... सुविधा तुमच्या दारी, हाच आमचा जबाबदारी!" या ब्रीदवाक्याला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे रावेर व यावल तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांना घरपोच वैद्यकीय तपासणी आणि UDID प्रमाणपत्रासाठीची आवश्यक कार्यवाही करून घेता आली. 

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ; 'या' तालुक्यांमध्ये मुसळधार बरसणार

या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी व लाभार्थी दिव्यांग बांधवांनी आमदार अमोलभाऊ जावळे आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!