यावल - फैजपुर रस्त्यावर आयशर वाहन पलटी होऊन शेतात जाणारे आदिवासी १९ शेतमजूर महिला पुरुष जखमी : काही आदिवासी अल्पवयीन शेतमजूर असल्याने अनेक प्रश्न उपस्थित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) : यावल फैजपूर रोडवर हिंगोणा- सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम करण्यासाठी जाणारे एकूण १९ आदिवासी असलेले स्री - पुरुष शेतमजूर जखमी झाल्याची घटना आज दि.६ रोजी सकाळी घडली.

(ads)

आयशर वाहन पलटी झालेल्या अपघातात शितल लाधर पावरा वय १४,भुरी सुलाराम पावरा, वय १२, मीना सुभाष पावरा २४, मेहंदी बाई लालधर पावरा ३०,मिहमा सुनील पावरा १२, विरालाल सुरमत पावरा,२६, खेना रवींद्र पावरा १५, दिवती सुनील पावरा १४, जगन सुरमल पावरा १३, मंगला सखाराम पावरा, अनिता बाजु पावरा १७, शहनाज शकील तडवी २८, सुनिता भिकाराम पावरा १५, आसिफ सुभेदार तडवी २४, विराज दगडू पावरा २१, गिज सागर पावरा १५,राधा सखाराम पावरा नसदिम सुभेदार तडवी २७, बाली तुकाराम पावरा ३० सर्व राहणार कुंड्या पाणी हे जखमी झाले.

(ads)

जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात   डॉ.तुषार सोनवणे सर,डॉक्टर प्रज्वल सर तसेच परिचारिका लीना राणे,सी कोल्हे,ए.एम.ठोके यांनी तातडीने औषध उपचार सुरू केला.

(ads)

अपघातामध्ये बरेच अल्पवयीन आदिवासी शेतमजूर असल्याने अपघात दाखल करताना शेतमजूर कुठे आणि कोणत्या गावात जाणार होते आणि त्यांना मजुरीवर कोणी सांगितले ? अल्पवयीन मुला-मुलींना शेतमजुरी करता येते का.? अपघात झाला असला तरी पोलीस यंत्रणा,आरोग्य विभाग नेमक्या कोणत्या पद्धतीने कार्यवाही करणार..? याकडे तालुक्यातील नागरिकांचे, शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!