‘रक्तदान करा, जीवनदान द्या’चा संदेश; काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
यावल ( सुरेश पाटील) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाले.
वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता रक्तदानाच्या माध्यमातून गरजूंच्या जीवनाला हातभार लावण्याचा अभिनव संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
(ads)
‘रक्तदान करा,जीवनदान द्या’ या संदेशाने प्रेरित होऊन काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिकांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देणारे मानवतावादी कार्य असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
(ads)
या रक्तदान शिबिराला यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांतभाऊ पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील, शहराध्यक्ष मो.हकीम शेठ, नगरसेवक करीम मेंबर,उमर कच्छी,समीर मेंबर,अझर मेंबर, मझर मेंबर,निसार मोमीन,पराग सराफ,अताऊल्ला शेठ,रफिक टेलर,शफीभाई,शरीफभाई, अकील सर,अमोलभाऊ भिरुड, टेनु सोनार,असलम मेंबर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(ads)
यावेळी महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष कल्पना अजय तायडे, गणेश गुरव सर,फैजपूरचे युवराज भंगाळे,राजू आस्वार, शरद पाटील,नईमभाई,गिरीश देशमुख,सरफराज पिंजरी, किरण तडवी,सुलोचना तायडे, सुनील पाटील,अभय महाजन, उमेश जावळे,अनिल पाटील, धीरज कुरकुरे,सूरज राजपूत, सतीश आबा पाटील,कमाल तडवी,भरत पाटील,गौरव सोनवणे,उमेश नाफडे,तायडे, दुर्गदास महाजन,पिरन तडवी आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
(ads)
वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड सध्याच्या काळात वाढदिवस विविध प्रकारे साजरे केले जात असताना, रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श यावल तालुका काँग्रेस कमिटीने निर्माण केला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी,हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
(ads)
या उपक्रमामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसाला सामाजिक संवेदनशीलतेची आणि सेवाभावाची जोड मिळाली.राजकीय कार्यक्रमांपेक्षा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचे चित्र शिबिराच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
(ads)
‘वाढदिवस साजरा करण्याची पद्धत बदलूया शुभेच्छांसोबत समाजाला रक्तदानाच्या रूपाने जीवनदान देऊया ’, असा प्रेरणादायी संदेश या रक्तदान शिबिरातून देण्यात आला.


