यावल ( सुरेश पाटील )
राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर,नाशिक येथील वरिष्ठ सहाय्यक वर्ग-३ रामचंद्र नरसू माकरे यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात तसेच लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
(ads)
शासकीय वैद्यकीय बिलाची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी माकरे यांनी तक्रारदाराकडे ₹ ३ हजारांची लाच मागितल्याचा आरोप होता. तडजोडीनंतर ₹ २ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माकरे यांना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी नाशिक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उपलब्ध पुरावे व साक्षी तपासल्यानंतर न्यायालयाने रामचंद्र नरसू माकरे यांना दोषी ठरविले.
(ads)
न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये सहा महिने कारावास व ₹ १ हजार रुपये द्रव्यदंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास,अशी शिक्षा सुनावली.तसेच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम १३(२) अन्वये एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
(ads)
या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.प्रेस नोटनुसार पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मौराळे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज केले.शासकीय कार्यालयांतील लाचखोरी विरोधात एसीबीचा इशारा दरम्यान,कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी अथवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी व्यक्ती शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
(ads)
लाचखोरीला आळा घालण्यासाठी तक्रारदारांनी पुढे येण्याची गरज असून, लाच स्वीकारताना शासकीय कर्मचाऱ्याला झालेली शिक्षा ही इतर लाचखोरांसाठीही धोक्याची घंटा ठरणार आहे.
याबाबत नाशिक येथील लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाचे वाचक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, तकारदार यांचे शासनाकडील मंजुर वैद्यकीय बीलाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी आरोपी लोकसेवक रामचंद्र नरसु माकरे,वरीष्ठ सहाय्यक वर्ग ३ राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपुर नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडे
दि.१६ सप्टेंबर २०१४ रोजी शासकीय पंचासमक्ष ३,००० /- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २,०००/- रुपये लाचेची रक्कम तकारदार यांचेकडुन राज्य कामगार विमा योजना रुग्णालय,सातपुर नाशिक येथील वैद्यकीय खर्च प्रतिकृतीकक्षा समोरील हॉलमध्ये स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असता त्यांचे विरुध्द सातपुर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गु.नं. ३०६९ /२०१४ प्र.प्र.अधि. सन १९८८ चे कलम ७,१३ (१) (ड) सह १३ (२) प्रमाणे दि.१६ सप्टेंबर २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास तत्का तपासी अधिकारी यांनी पुर्ण करुन जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक न्यायालयात दि.९ एप्रिल २०१५ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते त्याचा स्पेशल केस क्रमांक १९/२०१५ असा होता.सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधिश अमित विनायक खारकर नाशिक यांचे समोर होवुन आरोपी लोकसेवक रामचंद्र नरसु माकरे, वरीष्ठ सहाय्यक वर्ग ३ राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपुर नाशिक यांना सदर खटल्यात दोषी ठरवुन मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश अमित विनायक खारकर,नाशिक यांनी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे ६ महिने कारावास व १००० /- रुपये द्रव्य दंड, दंड न भरल्यास १
महिना कारावासाची शिक्षा तसेच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३ (२) प्रमाणे १ वर्षाची कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.सदर खटल्यात भारत तांगडे,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र,नाशिक प्रदिप मैराळे,अपर पोलीस अधीक्षक व श्रीमती कविता फडतरे,अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली
श्रीमती रुपाली खांडवी,पोलीस निरीक्षक व कोर्ट पैरवी अंमलदार प्रदिप काळोगे,पोलीस हवालदार यांनी कामकाज केले आहे. तसेच सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे व सचिन गोरवाडकर यांनी कामकाज पाहीले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र,नाशिक तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की,कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणीही शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी
करीत असतील तरी कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.खालील भ्रमणध्वनी क्रमांक व दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोयीच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार करण्यासाठी लँड लाईन ते लँड लाईन व भ्रमणध्वनी ते लँड लाईन अशी टोल फि क्रमांक १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली असुन सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली संबंधी व करावयाच्या तकारी संबंधी नागरीकांनी संपर्क साधावा.
दुरध्वनी क्रमांक टोल फ्रि क्रमांक १०६४ सर्व ठिकाणचे तसेच दूरध्वनी क्रमांक नाशिक ०२५३ - २५७५६२८, २५७८२३०, अहिल्यानगर
०२४१-२४२३६७७,
धुळे ०२५६२-२३४०२०
नंदुरबार ०२५६४-२३०००९
जळगांव ०२५७-२२३५४७७
नाशिक परिक्षेत्रीय कार्यालय
व्हॉट्सअँप कमांक
९५४५६५१०६४ या नंबर वरती संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


