यावल येथील साने गुरुजी व बाल संस्कार,जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे चमत्कार सादरीकरणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यावल शाखेतर्फे यावल येथील पी.एम.श्री.साने गुरुजी विद्यालय आणि बाल संस्कार विद्या मंदिर आणि जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकताच (१३ ऑगस्ट २०२६ रोजी ) विद्यार्थ्यांसाठी चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील, देविदास फेगडे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(ads)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प विभागाचे कार्यवाह प्रा.दिगंबर कट्यारे यांनी विविध चमत्कारांचे प्रात्यक्षिक सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. चमत्कारांच्या नावाखाली समाजात निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धांना बळी न पडता प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

(ads)

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महा. अंनिस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बो-हाडे व यावल शाखेचे कार्याध्यक्ष प्रशांत महाजन यांनी सहकार्य केले.

याचप्रमाणे बाल संस्कार विद्या मंदिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यावल शाखेतर्फे बाल संस्कार विद्या मंदिर,यावल येथे गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी

(ads)

चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक गर्गे सर,देशमुख सर,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मधे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धांडे मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!