भर चौकात सरपंचाने गावठी कट्ट्याचे ट्रिगर दाबून हवेत गोळीबार केल्याने मोठी खळबळ : यावल तालुक्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील)

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील भर चौकात कोळन्हावी येथील सरपंचाने गावठी कट्ट्याचे ट्रिगर दाबून हवेत फायर / गोळीबार केल्याने पोलिसांनी देशी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत करून आरोपीस अटक केली.               

(ads)

यावल पोलिसांना खबर मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे,पो.उ.नि मैनुद्दीन सय्यद,पो.हे.कॉ रोहील गणेश,पो.कॉ.अनिल साळुंखे,पोकॉ हितेश बागुल यांच्यासह तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता किनगाव रोडलगत शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ एक नुकतेच फायर केलेल्या राऊंडची रिकामी पुंगळी मिळाली असता आजूबाजूच्या दुकानदारांकडे चौकशीतून विकास सोळंकेनेच फायरिंग केल्याचे निष्पन्न झाले.

(ads)

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करून रिकामी पुंगळी व इतर पुरावे जप्त केले. आरोपी फायरिंग करून जळगावकडे पळाल्याचे समजल्याने पोउनि अनिल महाजन,सचिन पाटील यांना जळगावला पाठवले.तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सोपान गोरे व त्यांचे पथक - सलीम तडवी,प्रदीप चवरे,सचिन घुगे यांनी संयुक्त शोध मोहीम राबवून आरोपीला रात्री १ वाजता कालिंका माता मंदिर जळगाव परिसरातून ताब्यात घेतले.

(ads)

आरोपी हा कोळन्हावी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच असून त्याचे कोळन्हावी परिसरात आदर्श हॉटेल, बियर बार व परमीट रूम आहे.

डांभुर्णी गावातील काही मुले त्याच्या हॉटेलवर येऊन मोबाईलवर व्हिडिओ काढून त्यास नेहमी त्रास देत होते व दि. २६/८/२०२६ रोजी भांडण झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी त्याने दि.२७/८/२०२६ रोजी डांभुर्णीत येऊन गावठी पिस्तुलमधून हवेत गोळीबार केल्याची कबुली दिली.

(ads)

त्याने हत्यार कोळन्हावी शिवारात असलेल्या त्याच्या मालकीच्या आदर्श हॉटेल जवळील शेतात लपवले होते. पोलिसांनी तिथे जाऊन एक गावठी बनावटीचे पिस्तल, मॅगजीनसह व एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल हस्तगत केला.

(ads)

आरोपी विरुध्द भा.न्या.सं.कलम १२५ व भारतीय हत्यार कायदा कलम ३ (१) , २५ ( १ ब ), ५(१), २५(१)(अ), २५(९), २९ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत,

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे,पोउनि मैनुद्दीन सय्यद करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!