गिरडगाव बसस्थानकावर एसटी बस थांबविण्याची मागणी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा प्रश्न; यावल आगार प्रमुखांना निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल (सुरेश पाटील)

गिरडगाव (ता. यावल) येथे सकाळच्या वेळेत एसटी बस नियमितपणे थांबत नसल्यामुळे शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सकाळी ६ वाजताची एसटी बस गिरडगाव बसस्थानकावर अधिकृतपणे थांबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

(ads)

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, ॲड. देवकांत पाटील, समाधान पाटील व शिवराम वैदू यांनी यावल एसटी आगार प्रमुखांना निवेदन दिले.

गिरडगाव येथून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी यावल तसेच इतर ठिकाणी शिक्षणासाठी प्रवास करतात. मात्र सकाळच्या वेळेत बस गिरडगाव येथे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढता येत नाही. त्यामुळे त्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

(ads)

६ वाजताची बस थांबविण्याची मागणी

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सकाळी ६.०० वाजताची एसटी बस गिरडगाव येथे थांबविण्यात यावी, अशी ठोस मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बसला अधिकृत थांबा मिळाल्यास विद्यार्थ्यांना वेळेत शाळा-महाविद्यालयात पोहोचणे शक्य होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.

(ads)

या निवेदनासोबत श्री. ना. भा. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचे पत्र तसेच ग्रामपंचायत गिरडगावचे पत्र जोडण्यात आले आहे.

(ads)

निवेदन स्वीकारण्यासाठी एसटी कर्मचारी प्रतिनिधी सागर सावंत उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून गिरडगाव येथे सकाळच्या बसला अधिकृत थांबा देण्याबाबत यावल एसटी आगार प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!