Chinawal Crime News : रावेर तालुक्यातील चिनावल येथील २७ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 

सावदा ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच मृत्यू; पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

चिनावल, ता. रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील चिनावल येथे एका २७ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री घडली. निर्मल युवराज महाजन (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

(ads)

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल महाजन याला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या नातेवाईकांनी मध्यरात्री सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

(ads)

वैद्यकीय तपासणीदरम्यान मयताच्या उजव्या डोळ्याजवळ ६ एम.एम. आकाराचे गोलाकार छिद्र (जखम) आढळून आले. या जखमेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(ads)

या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी सावदा पोलिसांना दिली. त्यांच्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची अ.मृ. क्र. २२/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.

(ads)

सदर नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.

हेही वाचा : दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक

बामनोद, फैजपूर येथील तलाठी व सर्कल कार्यालयांना अचानक भेट; अनावश्यक कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याच्या सूचना

दरम्यान, तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!