देवरुख तालुक्यातील कोंड्ये येथील निर्मला भिडे जनता विद्यालय व इंद्रनील तावडे कनिष्ठ महाविद्यालय येथे नववीत शिकणाऱ्या दिव्या दीपक लाड या विद्यार्थिनीने तयार केलेल्या एस.पी. हूक (S P Hook) या आत्महत्या रोखणाऱ्या उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर मानक अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.[ads id="ads1"]
या प्रदर्शनासाठी जिल्ह्यातून 750 नामांकने नोंदविण्यात आली. त्यातून 77 जणांची निवड झाली. त्यात दिव्याचा समावेश आहे. यासाठी तिला विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, मुख्याध्यापक अरुण कुराडे व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. [ads id="ads2"]
सध्या तरुणांमध्ये नैराश्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी तरुणांचे समुपदेशन करण्यासह विविध स्तरावरुन जनजागृती केली जात आहे .
हेही वाचा :- ब-हाणपूर - अंकलेश्वर महामार्ग देतोय अपघातास निमंत्रण
हेही वाचा :- जळगावातील तरुणाच्या खूनाचा उलगडा : जामनेरातील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या
हेही वाचा :- महाराष्ट्रात लवकरच "इतक्या" पदासाठी होणार पोलीस भरती ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा
नैराश्यामुळे तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे प्रयत्न सुरु असले तरीही काही वेळा अशा अप्रिय घटना घडतात. या सर्वांचा विचार करुनच आपण एस. पी. हूक हे उपकरण आत्महत्या रोखेल अशा उपकरणाचा शोध लावल्याचे दिव्या लाडने सांगितले. यासाठी आपल्याला विज्ञान शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शनही मोलाचे ठरले, असे दिव्याने स्पष्ट केले. राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी या उपकरणाची निवड झाली आहे, ही नक्कीच आनंदाची बाब असली तरीही या उपकरणाचा वापर होण्याची वेळच येऊ नये, असे आपल्याला वाटते असे मत दिव्याने व्यक्त केले.