भुसावलातील बँक ऑफ बडोदात चोरीचा प्रयत्न फसला!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 लष्करी प्रतिबंधित क्षेत्रातील घटनेने खळबळ : पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहणी

भुसावळ : शहरातील आरपीडी रोडवरील ऑर्डनन्स फॅक्टरीजवळील लष्करी प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेत चोरट्यांनी पाठीमागील भिंत फोडून स्ट्रांग रूममधून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न मात्र असफल झाला. सोमवारी १७ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे हा परिसर लष्कराच्या अंतर्गत येतो. सैन्याचा खडा पहारा या भागात २४ तास असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

सलग सुट्या आल्याने साधली संधी आरपीडी रस्त्यावर भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी असून त्यालगतच लष्कराच्या परिसरात ११८ टीए मिल्ट्री बटालियन परिसरात बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. या बँकेत लष्करातील शेकडो कर्मचाऱ्यांचे बँक खाते असून दररोज लाखोंची उलाढाल होत असते. [ads id="ads2"] 

  शिवाय बँकेत जाण्यापूर्वी लष्करी डेपोतून प्रवेश करावा लागतो व तेथे सलग २४ तास जवानांचा खडा पहारा असतो. मात्र शनिवार व रविवार लागून आलेल्या सुट्यांमुळे चोरट्यांनी प्लॅन रचला.

हेही वाचा : - ट्रॅक्टर उलटून दोघे भाऊ ठार ; भुसावळ तालुक्यातील घटना 

 बँकेच्या बंद पडलेल्या शौचालयाला भगदाड करून बँकेचे स्ट्रांग रूम गाठले तसेच स्ट्रांग रूमचे चॅनल गेटचे कुलूप कापण्याचा प्रयत्नही झाल्याचे सोमवारी बँक उघडल्यानंतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर खळबळ उडाली, मात्र सुदैवाने स्ट्रांग रूम न फुटल्याने लाखोंची रक्कम सुरक्षित राहिली. तर चोरट्यांनी आता थेट लष्कराच्या परिसरात चोरीचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : - आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बामणोद येथील युवकाचे आढळले प्रेत 

नऊ लाख रुपये सुरक्षित

बँकेच्या लॉकरमध्ये सुमारे नऊ लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती असून ती सुरक्षित आहे. चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास

लष्कराच्या प्रतिबंधित परिसरात बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस प्रशासनाने ही बाब अधिकच गांभीर्याने घेतली आहे. या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून संशयितांची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली. सलग दोन दिवस आलेल्या सुट्यांमध्ये बँक परिसरात नेमके कोण आले व गेले याची माहिती पोलिसांकडून काढली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!