सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील तापी नदीच्या बॅक वॉटर मूळे अनेक नागरिकांचे पुनर्वसन विभागाकडून भू संपादन करण्यात आलेले असून या भू संपादन झालेल्या जागेवर भूमिहीन ज्यांच्या जवळ राहण्यासाठी घर जागा नाही अशालोकानी या जागेवर आपले संसार थाटले आहे या लोकांचे प्रधानमंत्री घरकुल योजनेत नावे आली असून त्याचे नावे जागा नसल्याने घरकुल बांधण्यास अडचण निर्माण होत आहे. [ads id="ads2"]
तरी सदर अतिक्रमण धारकांनी ऐनपूर ग्रामपंचायत कार्यालयात जागेची मागणी केली होती त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयाकडून ठराव घेवून मा.जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता यावर म.जिल्हाधिकारी साहेब यांनी ग्रामपंचायत च्या हद्दीतील गावठाण जमिनीवर या लोकांना 300स्के. फीट प्रमाणे जागा देण्याचे आदेश पारित केले त्यानुसार आज दिनांक १७/०२/२०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाकडून भगवती मंदिर परिसराला लागून असलेल्या गावठाण जागेत एकूण ३८ अतिक्रमण धारकांना प्लॉट मोजून देवून वितरण करण्यात आले.
हे ही वाचा :- स्तुत्य उपक्रम : रावेर तालुक्यातील वाघोड, शालेय समितीने चक्क वर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांना वाटप केले गणवेश
पंचायत समितीतून आलेले म.सपकाळे साहेब व ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे यांनी प्लॉट चे मोजमाप करून वाटप केले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी सोपान कोळी भगवान कोळी विनायक पाटील जितेंद्र महाजन पृथ्वीराज जैतकर प्रकाश भिल सुरेश कोळी प्रवीण कोळी बरेच महिला व पुरुष उपस्थित होते.

