त्यासंदर्भात रावेर गटविकास अधिकारी (Raver BDO) यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या पाच ग्रामसेवकांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविले होते. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी १६ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर यांच्याकडे पत्र पाठविले आहेत. पाच हे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र सत्य असल्याचे पत्रात नमूद केलेले आहे. [ads id="ads2"]
Jalgaon जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपणाकडे ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी यांनी आमच्या रुग्णालयाकडुन एस ए डी एम या प्रणालिचे अपंग प्रमाणपत्र आपल्याकडे सादर केले आहे, तरी ते दिव्यांग प्रमाणपत्र सत्य असुन त्यावेळेस त्यांच्या आजाराप्रमाणे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते,
हे ही वाचा :- स्तुत्य उपक्रम : रावेर तालुक्यातील वाघोड, शालेय समितीने चक्क वर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांना वाटप केले गणवेश
तरि शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे ( स्थायी वैद्यकिय मंडळ) यांनी दि.०८ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या अहवाला नुसार सदरील ग्रामसेवक यांना अपंगत्व नाही असे आढळून आलेले आहे, तरि सदर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे (स्थायी वैद्यकिय मंडळ) अहवालाशी आम्ही सहमत आहोत. ग्रामसेवक नितीन दत्तु महाजन, राहुल रमेश लोंखडे, रविंद्रकुमार काशीनाथ चौधरी, श्रीमती छाया रमेश नेमाडे, श्यामकुमार नाना पाटील अशी ग्रामसेवकांची नावे असून या पत्रामुळे पाचही ग्रामसेवकांचा दिव्यांग प्रमाणपत्र चा विषय निकाली निघाला आहे.

