यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील साकळी येथील राहत्या घरात एका तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज दि.१७ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही . मोहम्मद इसा तडवी ( वय २१ ) रा .साकळी असे मयत तरुणाचे नाव असून सदर घडलेल्या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
सविस्तर माहिती अशी की, मोहम्मद तडवी हा आई,वडील, दोन भाऊ यांच्या सह साकळी येथील इंदिरा नगर भागात वास्तव्यास आहे . आई,वडिल तसेच लहान दोघ भाऊ यांच्यासह मोहम्मद हा मजुरी करून घरातील चूल पेटवण्या साठी मदत करत होता. [ads id="ads2"]
दि.१७ फेबुवारी वार गुरुवार रोजी आई,वडिल,भाऊ हे सर्वजण मोल मजुरीच्या कामाला गेले असतांना मोहम्मदने आपल्या घरात साडी गळ्याला बांधून घराच्या छताच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली होती.
हे ही वाचा :- स्तुत्य उपक्रम : रावेर तालुक्यातील वाघोड, शालेय समितीने चक्क वर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांना वाटप केले गणवेश
दुपारच्या सुमारास साडेतीन वाजेच्या सुमारास लहाण भाऊ हमीद हा जेवणासाठी घरी आल्यावर त्याने मोठा भाऊ मोहम्मद हा घरात लटकलेल्या अवस्थेत असल्याचे पाहिले व आजु बाजूला आरडाओरड करून लोकांना बोलविले असता लोकांनी बघितले असता तो मृत असल्याचे निर्दशनास आले. या घटनेची माहिती मिळताच यावल पो.स्टे. पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी पंचनामा करून अस्कमात मृत्युची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाचपोळे करीत आहे.

