🩸२१ सत्यशोधक मावळ्यांनी केले रक्तदान
धरणगाव प्रतिनिधी -पी.डी.पाटील सर
धरणगांव - माळी समाज व पाटील समाज मढी लहान माळीवाडा, धरणगाव येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. सत्यशोधक विचार मंच व सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती धरणगाव यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
सर्वप्रथम जगद्गुरु तुकोब्बाराय, संत शिरोमणी सावता महाराज, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक क्रांतीबा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहूजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तद्नंतर रक्तदान शिबीराला आबासाहेब राजेंद्र वाघ, हेमंत माळी, लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख, पी.डी. पाटील, आनंद पाटील, गटनेते विनय भावे, तेली समाजाध्यक्ष सुनिल चौधरी, कमलाकर पाटील, दिनेश भदाणे, प्रफुल्ल पवार, परशुराम पाटील, दिपक मराठे, रोहीत इंगळे, महेश्वर पाटील, मनिष चौधरी, लोकेश जाला, मनोज महाजन, अविनाश महाजन, विश्वास भाटीया, रामनाथ माळी, धिरज चौधरी, हेमंत माळी यांच्यासह अनेक सत्यशोधक मावळ्यांनी रक्तदान दिले.[ads id="ads2"]
या शिबिरात जळगाव येथील जीवन ज्योती ब्लड सेंटरचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर पाटील, शुभम गवळी, जगदीश सोनार, वृषल पाटील, गणेश गव्हाणे यांसह आदींनी रक्तदान शिबिराचे काम पाहिले. तद्नंतर उपस्थित रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे शेतमजूराची आत्महत्या ; परिसरात खळबळ
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
याप्रसंगी पाटील समाजाध्यक्ष भीमराज पाटील, माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, सल्लागार तथा पत्रकार जेष्ठ पत्रकार कडू महाजन, धनपा गटनेते विनय भावे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन ॲड.वसंतराव भोलाणे, मधुकर सिताराम माळी, किशोर पाटील, रवींद्र पाटील, दिलीप धनगर, संभाजी कंखरे, धनराज माळी, माधवराव पाटील, दगा मराठे, राजेंद्र पाटील, दिलीप मांगो महाजन, सोमा साळी, किशोर पाटील, महेश पाटील, दिपक महाजन, किशोर पवार, रामनाथ माळी, सुधाकर महाजन, धिरेंद्र पुरभे, नागराज पाटील, कमलेश बोरसे, राहुल रोकडे, कैलास पवार, सुधाकर मोरे, विक्रम पाटील, पत्रकार निलेश पवार, अविनाश बाविस्कर तसेच सत्यशोधक विचार मंच, सत्यशोधक शतकोत्तर महोत्सव समिती धरणगाव व शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर पुरोगामी विचारांचे पाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.