ठाकरे गटाला जबरदस्त धक्का ; निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना कोणाची..? यावरुन सध्या शिंदे व ठाकरे गटात जोरदार वाद रंगलेला असताना, केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (ता. 8) सर्वात मोठा निर्णय घेतला. शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्हं गोठवण्यात आलं असून, शिवसेना पक्षाचे नावदेखील आता या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.[ads id="ads1"] 

दरम्यान, शिंदे व ठाकरे गटांना आता नवीन चिन्हं दिले जाणार असून, त्यासाठी सोमवारी (ता. 10) दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना आपले पर्याय निवडणूक आयोगासमोर द्यावे लागणार आहेत. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरलाच होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.[ads id="ads2"] 

ठाकरे गटासाठी धक्का..

दरम्यान, निवडणूक आयोगाचा हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याचे समजते. सध्या मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक होत असून, या निवडणुकीतही ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्हही वापरता येणार नाही. त्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

https://www.suvarndip.com/2022/10/election-commission-big-decision-on-shivsena-and-bow.html

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावरुन केंद्रीय निवडणूक आयोगासमोर वाद सुरु आहे. आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने याबाबतचा निकाल लवकर घेण्याची मागणी शिंदे गटाने केली होती. तसे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाला पत्र पाठवलं होतं.

ठाकरे गटाने ‘आपण सगळी कागदपत्रे सादर करू, पण आपल्याला पुरेसा वेळ द्यावा,’ अशी मागणी केली होती. शिवसेनेकडून तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता, पण निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची ही मागणी फेटाळून लावताना, दोन्ही गटांना 24 तासांचा वेळ दिला होता.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

अखेर शनिवारी (ता. 8) या प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सलग चार तास बैठक झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. तसेच, शिवसेना पक्षाचे नावही आता दोन्ही गटांना वापरता येणार नसल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश

शिवसेना नाव, तसेच ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरू शकत नाही. दोन्ही गट निवडतील, त्या नावांनी ओळखले जातील. संबंधित गटांना मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडता येईल. त्यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून दोन्ही गटांना चिन्ह निवड करावी लागेल. त्यासाठी 10 ऑक्टोबर दुपारी 01:00 पर्यंत मुदत दिली आहे.

गटांच्या नावासाठी प्राधान्यक्रमाने तीन पर्याय द्यावे लागतील. तसेच चिन्ह वाटपासाठीही दोन्ही गटांना तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करावी लागतील. पसंती क्रमानुसार गटाचे नाव व चिन्हाचे वाटप केले जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!