मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव, उचंदा व मेळसांगवे शिवारातील बेटांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळातील शनिवारी छापे टाकल्याने खळबळ उडाली.[ads id="ads1"]
मुक्ताईनगर (विजय अवसरमल) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सन्मानीय आयुक्त सो., मा. श्री. कांतीलाल उमाप साहेब, संचालक, अं. व दक्षता मा. श्री. सुनील चव्हाण साहेब, तसेच विभागीय उप आयुक्त सो. मा. श्री. अर्जुन ओहोळ नाशिक विभाग नाशिक मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. मुंडे साहेब आणि मा. अधीक्षक सो. रा.उ.शु. जळगाव मा. श्री. जितेंद्र गोगावले साहेब, यांचे ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर महात्मा गांधी सप्ताह निमित्त गावठी हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेशानुसार विभागीय निरीक्षक श्री. सुजित ओ. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ मि. जळगाव यांच्या पथकास मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे शिवारात पुर्णा नदीच्या पात्रातील बेटांवर, ता.मुक्ताईनगर जि. जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारु निर्मिती होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमी नुसार [ads id="ads2"] दिनांक ०८ / १० / २०२२ रोजी विभागीय निरीक्षक, श्री. सुजित ओं कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, जि. जळगाव यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांगदेव येथून खाजगी बोटीने पुर्णा नदीपात्रातील मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे शिवारातील बेटांवर छापे टाकुन एकुण १९९६० लि. रसायन, गावठी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य व रसायनाचे प्लॅस्टीक व पत्री ड्रम मिळुन रु. २,६२,५००/- चा मुद्देमाल मिळुन आला. रसायन जागीच नाश करण्यात आले. घटनास्थळी कोणताही आरोपी मिळुन आला नसल्याने आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. सदर कारवाई विभागीय निरीक्षक श्री. सुजित ओं. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जालींदर साहेब, श्री. राजेश निं. सोनार, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, श्री. अमोद भडागे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिमा तपासणी नाका, पुर्णाड, तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर क. देशमुख, गोकुळ अहिरे सहा. दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान सर्वश्री नितीन पाटील, योगेश राठोड, अमोल पाटील, भुषण परदेशी, नंदु नन्नवरे, विजय परदेशी आणि पोलिस कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी यशस्वी रित्या पार पाडली. गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक श्री. सुजित ओ. कपाटे व दुय्यम निरीक्षक श्री. राजेश निं. सोनार आणि दुय्यम निरीक्षक श्री. अमोद भडागे हे करीत आहेत.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यांत या पुढेही अशा प्रकारच्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणा-यांविरोधात कारवाया सुरुच राहतील.