रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी)
रावेर तालुक्यात विविध ठिकाणी आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त महर्षि वाल्मीकी प्रबोधन रॅली काढण्यात आली. रॅली ची सुरुवात श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिर गाते येथून आशिर्वाद घेऊन करण्यात आली संपूर्ण रावेर तालुका सुदगाव ते तहसिल कार्यालय रावेर पर्यंत प्रत्येक गावात महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिमा पूजन करून मा. तहसिलदार यांना आदिवासी कोळी महासंघ तर्फे विविध न्याय्य मांगण्याचे निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]
यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र सुलभरित्या मिळणे, खावटी अनुदान वितरण व्यवस्था योग्यरित्या राबवावी, शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा, 36 च्या नोंदी शासनाने पुढाकार घेऊन करुन घ्याव्यात, जि. प. शाळांमध्ये आदिवासी मुलांना सुवर्ण जयंती महोत्सव शिष्यवृत्ती मिळावी, ठक्कर बाप्पा योजना योग्य प्रमाणात राबवावी, शालेय नोंदी दुरुस्त करण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात यावा. इत्यादी मागण्याचे निवेदन देण्यात आले,,, ही भव्य रॅली पहिल्यांदाच काढण्यात आल्याने सर्व तरुणांमध्ये जनजागृती व उत्साह दिसत होता. [ads id="ads2"]
रॅलीचे नेतृत्व आदिवासी कोळी महासंघाचे जेष्ठ नागरिक जिल्हा मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे, जिल्हा अध्यक्ष सुभाष सपकाळे,जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी,जिल्हा सदस्य हरिलाल कोळी,ता.अध्यक्ष मनोहर कोळी,युवा ता. अध्यक्ष चंद्रकांत कोळी,कोळी समाज ता.अध्यक्ष ईश्वर कोळी यांनी केले.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
तर रॅलीचे आयोजक व नियोजन उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन कोळी, उपाध्यक्ष सुपडु मोरे सरपंच, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव राजेंद्र महाले, सल्लागार नितीन सपकाळे सरपंच, सदस्य ईश्वर कोळी, सदस्य योगेश्वर कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी, ता. प्रसिद्धी प्रमुख भागवत कोळी,शहर अध्यक्ष राजुभाऊ कोळी,सदस्य विनोद कोळी, योगेश्वर कोळी, जयराम कोळी,संदश सपकाळे,बंटी कोळी यांनी केले.
त्यावेळी संदिप कोळी सरपंच, आनंदा कोळी सरपंच,नारायण तायडे कोळी, विनोद कोळी भगवान कोळी, विनोद दिलीप कोळी अनिल अट्रावलकर ,जितेंद्र कोळी, सागर खवले, सुभाष जैतकर, किशोर कोळी पंकज कोळी ,नंदू कोळी, ज्ञानेश्वर कोळी ,गणेश कोळी, भुषण कोळी,किशोर तायडे ,तेजस कोळी रितेश ठाकरे ,मनोहर सपकाळे विलास कोळी,दिलीप जैतकर,परविन कोळी,सचिन सोनवणे, निखिल कोळी,योगेश सैंदाणे,सचिन सपकाळे,भगवान कोळी,जगदीश सपकाळे,वासुदेव जैतकर, धीरज जैतकर ,रमेश कोळी सचिन सपकाळे सुभाष कोळी,मोहन कोळी,ईश्वर कोळी, रविकांत तायडे,हर्षल तायडे,विकास कोळी,रितेश ठाकरे,देवानंद कोळी,दिवाकर उन्हाळे, आकाश कोळी, संतोष बाविस्कर आदी शकडो पंचक्रोशीतील समाज बांधव यावेळी उपस्थित होती तसेच फक्त व्हाटसपच्या माध्यमातून शेकडो तरूण समाज बांधव जमल्या बद्दल समाच्यावतीने मनोहर कोळी यांनी सर्वाचे आभार मानले...

