यावल ( सुरेश पाटील)
खान्देशातील भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेले यावल तालुक्यातील शिरागड येथील तापी नदीच्या काठावर शेकडों वर्षांपुर्वी स्थापित श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरावर जायला रस्ताच नसल्यामुळे देवी भक्तांना खुपच हालअपेष्टा त्रास सहन कराव्या लागत आहेत.हि देवी नवसाला पावणारी असून येथे वर्षभर हजारों भाविकभक्तं नवस फेडायला,मानता द्यायला व दर्शन घ्यायला येत असतात.[ads id="ads1"]
शिरागड व कोळन्हावी ह्या दोन्ही गावांकडून मंदिरावर यायला व जायला कच्चा रस्ता होता,परंतु तो ही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने भाविक भक्तांना तापी नदीतील होडीत बसून आपला जीव मुठित धरूनच देवीचे दर्शनाला जावे लागते. याआधी ह्या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी येथे रस्ता व पूल व्हावा यासाठी शासन प्रशासनाकडे अनेकदा निवेदनही पाठविलेली आहेत.परंतु अजूनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही.[ads id="ads2"]
रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्या येथे नवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आल्या असता शिरागड येथील ग्रामस्थांतर्फे पुन्हा निवेदन देण्यात आलेले आहे.त्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरागड ते कोळन्हावी दरम्यान नविन रस्ता बनविण्यात यावा,दोन्ही गावांपासून मंदिरापर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी यासह इतरही मागण्या करण्यात आलेल्या आहेत.अशी माहिती शिरागड येथील सामा.कार्यकर्ते रवींद्र रमेश साळुंखे यांनी दिली आहे.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
तीर्थक्षेत्र,यात्रा व पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा..
श्री सप्तशृंगी देवीच्या नाशिक जिल्ह्यातील वणीचा मोठागड (सासर) व जळगांव जिल्ह्यातील शिरागडचा लहानगड (माहेर) हे एकच स्वरूप असुन येथील मंदिरही अनादी काळापासुन स्थापीत आहे.परंतु अजुनही शिरागडला तीर्थक्षेत्र,यात्रास्थळ व पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला नाही.याबाबतचे पत्र पर्यटनमंत्री ना.मंगल प्रभात लोढा यांचेकडेस पाठविले आहे.असे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी म्हटले आहे.